Click Image for Gallery
मना मना दार उघड
लेखिका : डॉ. शोभा पाटकर
किंमत 250 रु. / पाने १८४
'समुपदेशन'
या विभागात लिहिलेल्या कथांतून आपल्यासारखीच मध्यमवर्गीय संस्कारात वाढलेली माणसे
भेटतात. कधीकधी सुखाच्या हव्यासापायी ती मृगजळाचा पाठलाग करताना दिसतात, तर कधीकधी
स्वतःवरची जबाबदारी दूर न लोटता, कोठेतरी दिलासा शोधताना दिसतात. कैक वेळा
समस्यांच्या दबावाखाली आक्रमक मार्ग पत्करतानाही दिसतात. अशा या सर्व पीडित
व्यक्ती उलटसुलट विचारांत गोधळून जातात आणि आपल्या स्वतःच्याच संस्कार व
संस्कृतीला प्रश्न करीत राहतात.
अशा व्यक्तींबरोबर प्रवासात समुपदेशकाला उमजत जाणारे मानवी
जीवनाविषयीचे वास्तव अधिकाधिक व्यापक व सखोल होत जाते. बऱ्याच वेळा हे वास्तव
प्रश्नार्थकही होत जाते आणि म्हणूनच आव्हानात्मक ठरते यात शंका नाही.