Click Image for Gallery
प्रबोधनकार ठाकरेंचे
'हिंदुत्व' अणि ५१ मौलिक विचार
संकलन
: संजय चिटणीस
किंमत 25 रु. / पाने 61
प्रबोधनकारांच्या मौलिक विचारांवरून एक गोष्ट स्पष्ट होते, की प्रबोधनकारांचा 'हिंदू' बहुसंख्य भारतीयांच्या म्हणजेच, बळीराजाच्या परंपरेतील असून स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवून घेणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या म्हणजेच वामनाच्या परंपरेतील निश्चितच नव्हता. समाजसुधारक प्रबोधनकारांचे 'हिंदुत्व' हे सिंधू संस्कृतीशी निगडित असून त्याचा राष्ट्रीय स्वयंसेवकप्रणीत व पर्यायाने भाजपप्रणीत 'हिंदुत्वा'शी संबंध नाही. त्यामुळे अगदी 'हिंदुत्वा'च्या मुद्द्यांच्या अनुषंगाने विचार करताही शिवसेनेने प्रतिगामी व बुरसट विचारांच्या भाजपशी घेतलेली फारकत योग्यच आहे.