लिंगभाव
समजून घेताना..
मूळ
लेखन : कमला भसीन / भाषांतर : श्रुती तांबे
किंमत १५० रु.
स्त्रीपुरुषांमध्ये जी विषमता दिसते तिचे
कारण ना निसर्ग आहे, ना लिंग. जात, वंश आणि वर्ग यांतील विषमतेप्रमाणे स्त्रीपुरुषांमधील
विषमतासुद्धा पूर्णतः मनुष्यनिर्मित आहे. विशिष्ट ऐतिहासिक कालखंडामध्ये या विषमतेची
निर्मिती केली गेली आणि म्हणूनच तिला प्रश्न विचारले जाऊ शकतात, आव्हान दिले जाऊ शकते
आणि बदलही घडवून आणता येतो. स्त्री मुलांना जन्म देत असेल, पण म्हणून ती दुय्यम ठरत
नाही, तसेच त्यामुळे तिच्या शिक्षण किंवा नोकरी-व्यवसायावर परिणाम व्हायला नको. दोन
भिन्न प्रकारची शरीरे असली तरी त्यामुळे त्यांच्यात विषमता का निर्माण व्हावी? तुम्हाला
समान संधी, समान हक्क किंवा समान असण्यासाठी तुम्ही एकसारखेच असायला हवे असे नाही.