Click Image for Gallery
नंदा खरे
किंमत 200
रूपये / पाने 148
एकारलेल्या शहाणपणापेक्षा जगण्याच्या विविध अंगांना स्पर्श करत त्यातले परस्परसंबंध तपासणारे नंदा खरे यांचे ‘कुतूहलमिश्रित भान’ मला महत्वाचे वाटत आले आहे. आपल्या विशिष्ट अभ्यासविषयाच्या पलीकडे जाऊन आपला अभ्यासविषय समग्र जगण्याच्या पार्श्वभूमीवर पाहता येणे ही मला त्यांच्या बाबतीतली महत्वाची गोष्ट वाटते. त्याचा परिणाम त्यांच्या या लेखनातून खूप तपशीलाने पाहता येईल.