Click Image for Gallery
नीतीन
रिंढे
किंमत २५० रु. / पाने १९२
नितीन रिंढे यांनी लिहिलेल्या त्या पुस्तकात 'पुस्तकां'च्या कहाण्या आहेत. पुस्तकांसोबत घडलेले गमतीदार किस्से आहेत. पुस्तकांचा मनोरंजक इतिहास आहे. पुस्तकांशी जोडलेली, पुस्तकांनी झपाटलेली वेडी, (अगदी हिटलरपासून प्रदीप सेबस्टियनपर्यंतची) जगावेगळी माणसं आहेत. पुस्तकाशी निगडीत मजेदार-वेगळ्या घटना आहेत. त्या पुस्तकातून वाचनसंस्कृतीचं वेगळं जग पाहणं-वाचणं ही मौज आहे. म्हणूनच ते पुस्तक वाचताना गप्पांच्या मैफलीत सामील झाल्यासारखं वाटतं.