ब्राह्मणी मानसिकता आणि पु. ल. देशपांडे । संजय मेणसे
मुखपृष्ठ : किशोर मांदळे
पाने : १२४। किंमत : १५०/-
कुणी असं म्हणेल की, प्रत्येक लेखकाला, विचारवंताला त्याच्या काळाच्या मर्यादा असतात; आणि त्या काळाच्या मर्यादेतच आपण त्यांचं मुल्यमापन केलं पाहिजे. हा युक्तिवाद रास्तच आहे. परंतू तो पु.ल. देशपांडेंच्या बाबतीत कामाला येत नाही. पु.ल. देशपांडेनी ज्या काळात ही पुस्तके लिहिली त्या काळाच्या खूप खूप आधीच आपल्या महाराष्ट्रात अनेक क्रांतिकारी गोष्टी घडून गेलेल्या होत्या.
पु.ल. देशपांडे यांचे
लेखन घडले त्या काळाच्या शंभरेक वर्षे आधी महात्मा फुलेंनी मुलींसाठी पहिली शाळा काढली
होती. स्वत:चा हौद अस्पृष्यांसाठी खुला केला होता. लोकहितवादींची ‘शतपत्रे’ प्रसिध्द
झाली होती. अगदी पन्नास-साठ वर्षे आधी केशवसुतानी
कवितेतून ‘तुतारी’ फुंकली होती. पन्नास वर्षे आधी कोल्हटकरांनी ‘सुदाम्याचे पोहे’ लिहिले
होते. चाळीस-पन्नास वर्षे आधी राजर्षी शाहू व प्रबोधनकारानी भिक्षुकशाही विरोधात जागर
केला होता. दहाच वर्षे आधी देश स्वतंत्र्याची ओजस्वी क्रांती झाली होती. देश वसाहतवादातून मुक्त झाला होता. समतासुक्ताची
नांदी ठरावी असे लोकशाही-समाजवादी संविधान बाबासाहेब आंबेडकरानी देशाला दिले होते.
काळाने आपली मर्यादा साक्षात ओलांडली होती ! परंतु पु.ल. देशपांडे
स्वत:च आपल्या खचलेल्या ‘बटाट्याच्या चाळी’
पाशी थांबून राहिले होते.
प्रश्न काळाच्या मर्यादांचा आहे की पु.ल. देशपांडेंच्या मानसिकतेच्या मर्यादांचा ?